पुणे : मोबाईल चोर टोळी अटकेत ; बंडगार्डन पोलिसांची कारवाई | पुढारी

पुणे : मोबाईल चोर टोळी अटकेत ; बंडगार्डन पोलिसांची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणार्‍या आंतरराज्य टोळीला बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2 लाख 10 हजारांचे 12 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सतीश व्यंकटेश माधगोलू (वय 22, रा. उपलपेटा, जि. हैदराबाद, तेलंगणा ), जगदीश भास्करराव आवला (वय 22, रा. आंध— प्रदेश), विक्रम शिवनाथ दास (वय 22, रा. उपलपेटा, हैदराबाद), गणेश कृष्णा गोड (वय 22, रा. छत्तीसगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी तरुण पीएमटी बस स्टॉपवरून केशवनगर परिसरात जाणार्‍या बसमध्ये चढत असताना चार चोरट्यांनी त्यांचा 10 हजारांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना 5 ऑगस्टला घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस आरोपींचा शोध घेत होते.

त्यावेळी मालधक्काकडे जाणार्‍या रस्त्यावर चार जण थांबले असून, ते मोबाईल विकत घेण्याबाबत नागरिकांना विचारणा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडून 12 मोबाईल जप्त करण्यात आले. ही कामगिरी अपर आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त आर. एन. राजे, बंडगार्डन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, मोहन काळे, अनिल कुसाळकर, संजय वणवे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, तुळशीराम घडे यांनी केली.

हेही वाचा :

पुणे : चेंबरचा धोका; चुके काळजाचा ठोका ! चेंबर्समुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता

दहा लाख रुपयांची लाच स्वीकारणारा अधिष्ठाता अटकेत

 

Back to top button