ग्रामीण जनतेचा आरोग्य दूत हरपला; डॉ.शशिकांत अहंकारी यांचे निधन

ग्रामीण जनतेचा आरोग्य दूत हरपला; डॉ.शशिकांत अहंकारी यांचे निधन
Published on
Updated on

अणदूर : धाराशिव जिल्ह्यातील अणदूर (ता.तुळजापूर) सारख्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य चळवळ उभे करणारे डॉ. शशिकांत अहंकारी (Dr shashikant aghaori) यांचे निधनाने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा पोरगी झाली आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर अणदूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र ६५ लगत असलेल्या हॅलो मेडिकल फाउंडेशन या ठिकाणी बुधवारी दि.९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मागील काही वर्षांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून व जानकी रुग्णालयांच्या माध्यमातून त्यांनी मराठवाडयातील अनेक जिल्हे, सोलापूर, पुणे या सर्व जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र आरोग्य यंत्रणा उभा करून दांड्या वाडी,वस्ती येथील लोकांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. अनेक शिबिराच्या माध्यमातून उपचार केले. आज हा आरोग्य दूत आपल्यातून निघून गेल्याने आरोग्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

शासकीय आरोग्य यंत्रणेला पूरक म्हणून त्यांनी गावोगावी प्राथमिक उपचार केंद्र सुरू केली. त्यांच्या माध्यमातून पोषण गर्भवती महिलांची पोषण आरोग्य विषयीच्या महिलांच्या समस्या आदी वरती जनजागृती केली. बालविवाह मुलींचे होणारे लैंगिक शोषण एकल महिला कोरोना काळामध्ये विधवा झालेल्या महिला यांच्यासाठी विविध उद्योग उभा करून दिले हजारो महिलांच्या हाताला काम देणारे डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या निधनाने या आरोग्य क्षेत्रासह सामाजिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. आरोग्य विमा, स्वयं-सहायता गट, महिला सक्षमीकरण मंच,शाश्वत शेती आणि विज्ञान शिक्षण इत्यादीचा समावेश आहे.

भूकंपानंतर हॅलोची स्थापना

डॉ. शशिकांत अहंकारी व डॉ. शुभांगी अहंकारी यांनी ११९३ साली आपल्या आरोग्य क्षेत्रातील सहकारी १२ डॉक्टरांना घेऊन त्यांनी हॅलो मेडिकल फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून सन १९९३ साली झालेल्या भूकंप नंतर उद्भवलेल्या आरोग्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश ठेवून ही संस्था त्यांनी अणदूर सारख्या ग्रामीण भागामध्ये सुरू केली. आज या संस्थेच्या माध्यमातून फार मोठी आरोग्यसेवा ग्रामीण भागात दिली जात आहे.

राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित

आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेस वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. मागील वर्षीचा हा पुरस्कार हॅलो मेडिकल फाउंडेशन या संस्थेस देवून गौरव केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या साह्याने अनेक प्रकल्प आजही गावोगावी हॅलो मेडिकल फाउंडेशन राबवित आहे.अनेक प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो लोकांना त्यांनी काम उपलब्ध करून दिले आहे.

-हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news