

पुणे : प्रसिद्ध समाजसेवक, हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उद्या अणदूर या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी हे अहंकारी यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या गावापासून जवळ असलेल्या अणदूरमध्ये डॉक्टर अहंकारी यांनी आपल्या पत्नीसोबत हॅलो मेडिकल फाऊंडेशनची स्थापना केली होती. दोघे पती पत्नी जानकी हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते.
हेही वाचा