म्हसोबाचीवाडी विहिर दुर्घटना प्रकरण : मशिनमालकाने स्वत: रिस्क घेऊन रॅम्पवर पाठविली मशिन

म्हसोबाचीवाडी विहिर दुर्घटना प्रकरण : मशिनमालकाने स्वत: रिस्क घेऊन रॅम्पवर पाठविली मशिन
Published on
Updated on
शेटफळगढे(पुणे) : विहिरीत गाडल्या गेलेल्या 4 मजुरांच्या शोध मोहिमेत तीन दिवस वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात आल्या. ही शोध मोहीम यशस्वी झाली खरी. मात्र, 90 फुटांपर्यंतच्या रॅमचे काम झाल्यानंतर त्या कठीण टप्प्यावर काम करणे अवघड होते. हे अवघड  रेस्क्यू ऑपरेशन कोणती मशिन करणार व त्यावर कोण ऑपरेटर असणार, याची उत्सुकता होती. यावर निरगुडे येथील विजय काळे यांची मशिन या टप्प्यावर काम करण्यासाठी जाण्याचे निश्चित झाले. मात्र, कठीण ठिकाणावर मशिनलाही धोका आणि ऑपरेटरलाही धोका. अशा ठिकाणी कोणता ऑपरेटर काम करण्यास धाडस करत नव्हता. यावर मालक स्वतः ऑपरेटरसोबत मशिनमध्ये बसून या टप्प्यावर गेले व हे ऑपरेशन यशस्वी झाले.
म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (दि. 1) विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना ती रिंग कोसळून बेलवाडी येथील चार मजूर गाडले गेले होते. तब्बल 66 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या मजुरांचे मृतदेह शुक्रवारी (दि. 4) दुपारी दोन वाजता काढण्यात प्रशासनाला यश आले होते. धोकादायक विहिरीतून मजूर बाहेर काढण्यासाठी मोठ्या क्रेन आणून तसेच छोटे पोकलेन त्यात उतरवून ढिगार्‍यापर्यंत पोहोचविण्यात आले होते. मात्र, त्या मोहिमेलाही अपयश आले. त्यामुळे आता मजूर गाडले गेलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी रॅम तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते रॅमचे शुक्रवारी काम सकाळी साडेसहा वाजता पूर्ण झाले.
त्यानंतर 90 फूट खोलीवरील शेवटच्या टप्प्यावर आता मशिन कशी उतरणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. या टप्प्यावर सहापैकी तीन मशिन मोठ्या बूमच्या होत्या. त्यातील नेमकी कोणती मशिन या टप्प्यावर जाऊन काम करणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. या टप्प्यावर विजय काळे या मशिन मालकाची मशिन उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. या मशिनवरील ऑपरेटरचेही धाडस मानावेच लागेल. कारण, या विहिरीची खोली व तयार करण्यात आलेला रॅम आणि अर्धवट असलेली रिंग भीतीदायक होती.
उपस्थित असलेला जनसमुदाय, नातेवाईक, कर्मचारी, अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी अशा सर्वांच्या नजरा या ऑपरेशनकडे लागल्या होत्या. अशा परिस्थितीत काम करणे अत्यंत अवघड होते. मात्र, अशा अवघड ठिकाणी काम करण्याबरोबरच या ढिगार्‍यामध्ये अडकलेले मजूर बाहेर काढायचे होते. त्यामुळे मोठे दडपण असतानाही अक्षय ढोले (रा. लाकडी, ता. इंदापूर) व अमोल बोराटे (रा. मलवडी, ता. माण, जि. सातारा) या दोन ऑपरेटरनी धाडस करून मशिन उतरवली व मोहीम यशस्वी केली.

मनावर दडपण कायम होतेच!

ही यशस्वी मोहीम राबवणार्‍या फक्त ऑपरेटरने व त्यांच्या मालकाने दै. 'पुढारी'ला माहिती देताना सांगितले की, अवघड ठिकाणी मशिन नेण्याबरोबरच त्यामध्ये अडकलेली माणसे, त्यामुळे मनावर मोठे दडपण होते. काम करीत असताना त्यामध्ये प्लेट, मुरूम, दगड, लोखंडी रॉड यांचाही समावेश असल्याने काम करणे अवघड बनले होते. भरपूर असलेली खोली त्यामुळे मशिन सहकारी; परंतु मशिनमालक काळे यांनीही रिस्क घेण्याचे ऑपरेटरांना सांगितले होते. त्यामुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news