पुणे : ट्रकला टेम्पोची धडक; चालकासह दोघांचा मृत्यू | पुढारी

पुणे : ट्रकला टेम्पोची धडक; चालकासह दोघांचा मृत्यू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत टेम्पोचालकासह दोघांचा मृत्यू झाला. संतोष मारुती गिरी (वय 45), दत्तात्रय तुकाराम गिरी (वय 55,रा. दोघे फलटण, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अनिल यादव (वय 30, रा. उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.4) सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास मुंबई-बंगळुरू हायवेवर मामा दा ढाबासमोर, जांभूळवाडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल यादव हा त्याचा ट्रक घेऊन पुढे चालला होता. त्या वेळी संतोष गिरी याने त्याच्या टेम्पोने ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये संतोष आणि दत्तात्रय दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

हेही वाचा

बोगस कागदपत्रांद्वारे सीमकार्डची विक्री

७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप पवारांवर; मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

पुणे : कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी पीएमपीकडून भेट!

Back to top button