पुणे : कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी पीएमपीकडून भेट! | पुढारी

पुणे : कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी पीएमपीकडून भेट!

पुणे : शहरातील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनादेखील आता सवलतीच्या दरात पीएमपीचे बस पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पीएमपी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून, येत्या 15 ऑगस्ट पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

तरुणाईला दुचाकी सोडून पीएमपीच्या बससेवेकडे आकर्षित करण्यासाठी पीएमपीचें अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी पीएमपीचे अध्यक्ष सिंह यांनी मुख्य कार्यालयात ही माहिती दिली. या वेळी पीएमपीचे सहव्यवस्था पकीय संचालक नितीन नार्वेकर, वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, दत्तात्रय झेंडे, अभियंता रमेश चव्हाण, सतीश गाटे आदी उपस्थित होते.

शहरात अनेक क्लासेस असून, त्यामध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अशा विद्यार्थ्यांना आता सवलतीच्या दरात पासेस उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 15 ऑगस्टपासून ही सेवा सुरू करण्यात येईल.

– सचिंद्र
प्रताप सिंह, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएल

हेही वाचा

तिकडे धोंडे जेवणाला गेले अन् इकडे 30 तोळे सोने पळविले!

‘शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षांत जगदंबा तलवार भारतात आणण्याचे प्रयत्न’

‘जयप्रभा’ चित्रपट महामंडळाकडे हस्तांतरित करण्याची गरज

Back to top button