…तर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गुन्हा नोंदवा : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर | पुढारी

...तर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गुन्हा नोंदवा : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे : सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर दहा दिवसांत गुन्हे दाखल करावेत. हे गुन्हे दाखल झाले नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॅकमेल करण्यासाठी आरोप केले, असे म्हणावे लागेल. असे असेल तर पंतप्रधानांनी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसची माफी मागावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. दहा दिवसांत गुन्हे दाखल झाले नाहीत किंवा पंतप्रधानांनी माफी मागितली नाही, तर त्यांचा खोटारडेपणा देशासमोर आणण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करू, असाही इशारा अ‍ॅड. आंबेडकर यांनी दिला.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, मोदी यांनी 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्यावर केले. पंतप्रधान जेव्हा अशा प्रकारे आरोप किंवा विधान करतात, तेव्हा त्यांनी ईडी, सीबीआय, आयकर या सर्व विभागांकडून माहिती घेतलेली असणार. त्या विभागांकडे असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करूनच भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले असणार. सहभागी असल्याचे आरोप केले असणार. मात्र, त्यावर अद्याप काहीच झालेले नाही.

हेही वाचा

नाशिक : रोकड-दागिन्यांसह फरार वधू पोलिसांच्या ताब्यात

‘ग्रेट बॅरियर रीफ’च्या रक्षणाबाबत ‘युनेस्को’ला आशा

कोल्हापूर : डेंग्यूचा डंख जीवावर

Back to top button