सौर पॅनेलच्या कार्यक्षमतेसाठी ‘स्पार्क’; महावितरणचे मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ यांचे संशोधन

सौर पॅनेलच्या कार्यक्षमतेसाठी ‘स्पार्क’; महावितरणचे मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ यांचे संशोधन

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सौरऊर्जेच्या पॅनेलमधून वीजनिर्मितीची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी 'स्पार्क' उपकरणाची निर्मिती केली आहे. महावितरणचे मुख्य अभियंता (चाचणी) डॉ. मनीष वाठ यांनी ाचे संशोधन केले आहे. नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेमध्ये विकसित या उपकरणाची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली.

केंद्र व राज्य शासनाच्या प्रोत्साहनामुळे सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पांना वेग आला आहे. नागरिकांकडून देखील प्रतिसाद वाढत आहे. सौरऊर्जेच्या निर्मितीमध्ये सौर फोटोव्होल्टेइक (पीव्ही) पॅनेल केंद्रबिंदू आहे. सौर पॅनेलद्वारेच सूर्याच्या उष्णतेचा, ऊर्जेचा उपयोग करून त्याचे विजेमध्ये रूपांतर केले जाते. प्रत्येक सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये निर्धारित वीजनिर्मितीच्या क्षमतेनुसार सौर पॅनेल बसविले जातात.

मात्र, वीजनिर्मितीच्या क्षमतेत सातत्य राखण्यासाठी साधारणतः 25 वर्षांचे आयुर्मान असलेल्या सौर पॅनेलची देखभाल व दुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे. सौर पॅनेलकडून निर्धारित क्षमतेएवढी वीजनिर्मिती होत नसल्यास त्यासाठी कारणीभूत सौर पॅनेलमधील बिघाड, दोष किंवा विविध प्रकारचे अडथळे, याबाबतची तपासणी व देखरेख ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याद्वारे पॅनेलमधील बिघाड त्वरित शोधले जाऊन निर्धारित क्षमतेएवढ्या सौरऊर्जानिर्मितीमधील सातत्य कायम ठेवणे आता शक्य झाले आहे.

नेमकी काय आहे यंत्रणा

'स्पार्क' उपकरणामध्ये प्रामुख्याने सौर पॅनेलच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी देखरेख प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यासाठी पॅनेलच्या आवश्यक सर्व घटकांचा वारंवार आढावा घेतला जातो. तसेच फोटोव्होल्टेइक (पीव्ही) पॅनेलसाठी किमान व्होल्टेज सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. या सेन्सरद्वारे पॅनेलच्या निर्धारित केलेल्या क्षमतेएवढ्या वीजनिर्मितीमध्ये काही अडथळे आल्यास ते शोधले जातात व त्याची माहिती दिली जाते.

पीव्ही पॅनेल्सच्या आऊटपूट व्होल्टेजचे सातत्याने निरीक्षण, विश्लेषण व रिअल टाईम मॉनिटरिंग केले जाते. तसेच निर्धारित व प्रत्यक्ष सुरू असलेली सौरऊर्जानिर्मिती यांची तुलना केली जाते. सौर पॅनेलमधील ओपन सर्किट व शॉर्ट सर्किटची माहिती दिली जाते. त्यासाठी या उपकरणात खास डिसप्ले युनिट बसविण्यात आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news