दगडूशेठ मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान, 'या' दिग्गजांनीही दिली होती भेट | पुढारी

दगडूशेठ मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान, 'या' दिग्गजांनीही दिली होती भेट

अक्षय मंडलिक

पुढारी ऑनलाईन : पुण्यातील दगडूशेठ मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. भारताचे राष्ट्रपती ते माजी पंतप्रधान आणि अनेक मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दगडूशेठ गणपती मंदिराला भेट दिली होती. परंतु, नरेंद्र मोदी हे पहिले आहेत, ज्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. गणपती बाप्पासमोर नतमस्तक होत पंतप्रधान मोदी यांनी अभिषेक, पूजन केले.

यापूर्वी अनेक दिग्गजांनी दगडूशेठ मंदिराला भेट दिली आहे. फखरुद्दीन अली अहमद यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून भेट दिली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, चंद्रशेखर आणि इंद्र कुमार गुजराल हे पंतप्रधान नसताना मंदिरात आले होते. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दगडूशेठ मंदिराला भेट दिली होती. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनीही नुकतीच मंदिरात पूजा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना आज सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण राज्याचं लक्ष आज पुण्याकडे लागलेलं आहे. हा कार्यक्रम अराजकीय असला तरीही अनेक राजकीय नेते या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने आजचा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय.

हेही वाचा

पुणे : पंतप्रधान दौर्‍यासाठी पाच हजार पोलिस ; एसपीजीच्या पथकाकडून आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची स्वागताला उपस्थिती

नरेंद्र मोदी ‘चले जाव’ आंदोलन सुरू; महाविकास आघाडीच्यावतीने पंतप्रधानांचा निषेध

Back to top button