पुणे : पंतप्रधान दौर्‍यासाठी पाच हजार पोलिस ; एसपीजीच्या पथकाकडून आढावा | पुढारी

पुणे : पंतप्रधान दौर्‍यासाठी पाच हजार पोलिस ; एसपीजीच्या पथकाकडून आढावा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. त्यासाठी पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले एसपीजीची (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) पथके, एसआरपीएफ, फोर्सवनचे जवान तैनात असणार आहेत. कार्यक्रमस्थळाची बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाने पाहणी केली असून, 28 जुलैपासून कार्यक्रम होईपर्यंत दौर्‍याचा परिसर ‘नो फ्लाइंग झोन’ करण्यात आला आहे. मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटनदेखील होणार आहे. 1 ऑगस्टला पंतप्रधानांच्या दौर्‍यासाठी प्रशासकीय तसेच सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या असून, कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी संबंधित यंत्रणा बैठका घेत आहेत.

विविध अधिकार्‍यांना जबाबदारीचे वाटपही करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा पंतप्रधानांच्या दौर्‍यावर लक्ष ठेवून आहेत.

असा आहे दौरा…
मोदी यांचा हा एकदिवसीय दौरा असून, विमानाने ते लोहगाव येथील हवाई दलाच्या टेक्निकल एअरपोर्ट येथे येतील. त्यानंतर ते हेलिकॉफ्टरने शिवाजीनगर (सिंचनगर) येथील अ‍ॅग्रिक्लचर कॉलेजच्या मैदानावर पोहोचतील. पुढे ते वाहनाने रस्तामार्गे सर्व नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी (दि. 28) पंतप्रधानांच्या केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी (एसपीजी) त्यांच्या पुणे दौर्‍यांचा आढावा घेतला. एसपीजीच्या पथकाने पंतप्रधान उतरणार असलेले हेलिपॅड, त्यांचे कार्यक्रम होणारी ठिकाणे, त्याचबरोबर त्यांचा ताफा जाणारे रस्ते याची पाहणी केली. त्यानंतर दौर्‍याचे काम पाहणार्‍या सर्व प्रशासकीय यंत्रणांची एकत्रित बैठक घेतली. या वेळी त्यांनी (पान 4 वर)

एसआरपीएफ, फोर्सवनची पथके तैनात
पंतप्रधानांच्या दौर्‍यासाठी शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) तीन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर फोर्स वनची पथकेदेखील सुरक्षेसाठी असणार आहेत. रस्ते बंदोबस्त आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना तैनात करण्यात येणार आहे, तर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजीचे जवान असणार आहेत. फ

पोलिसांकडून शहरात कोम्बिंग ऑपरेशन
मोदींच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात हॉटेल, लॉजची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे. त्यासाठी कोम्बिंग ऑपरेशनची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

हेही वाचा :

Cyber fraud : तब्बल 439 एटीएम कार्ड क्लोन करून बँकेला कोटींचा गंडा

सांगली : रिक्षावाला खड्डे मुजवू लागला अन् आली महानगरपालिकेला जाग

Back to top button