मेथी, कोथिंबीर, शेपू चे भाव गडगडले | पुढारी

मेथी, कोथिंबीर, शेपू चे भाव गडगडले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार नारायणगाव(ता.जुन्नर) या ठिकाणी शनिवारी( दि.२९)कोथिंबीर,मेथी,शेपू च्या जुड्यांची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजारभावात घसरण झाली मुंबईसह इतरत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोथिंबीर मेथीची मागणी कमी झाली त्यामुळे व्यापार्यांनी शनिवारी खरेदी केलेल्या कोथिंबीर मेथी शेपूच्या जुड्या बाजारपेठेतच सोडून दिल्याने कोथिंबीर मेथीच्या ५० ते ६० हजार जुड्या बाजार समितीतच पडून होत्या.

शनिवारी उपबाजार नारायणगाव येथे कोथिंबीर, मेथी, शेपू यांची एकूण ३ लाख २५ हजार १०० जुड्यांची आवाक झाली. लिलावात धन्याची १ लाख ४९ हजार १०० जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्याला किमान ५१ रुपये ते कमाल १८०१ रुपये दर मिळाला, मेथीची १ लाख ६२ हजार ६०० जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्याला किमान १०१ रुपये तर कमाल ९०१ रुपयाचा भाव मिळाला.शेपूच्या १३ हजार ४०० जुड्यांची आवक होऊन १०० जुड्याला किमान ३०१ तर कमाल १२०१ भाव मिळाला.

दरम्यान, उप बाजारात ८ हजार ७०५ टोमॅटो क्रेट ची आवक होऊन २० किलोच्या एका क्रेटला किमान ६०० ते २ हजार २०५ रुपये भाव मिळाला असल्याचे बाजार समितीचे उपसचिव शरद धोंगडे यांनी सांगितले. उप बाजार समिती नारायणगाव या ठिकाणी येणारी तरकारी, कोथिंबीर , मेथी व भाज्या यांचा लिलाव झाल्यानंतर व्यापारी ते पुढील विक्रीसाठी पुणे,मुंबई सारख्या ठिकाणी पाठवत असतात मुंबई येथे सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे तरकारी बरोबर इतरही भाज्यांची मागणी कमी झाली आहे त्यामुळे बाजारभावात घसरण झाली आहे.
दरम्यान,बाजार समितीत लिलावात ज्या मेथी,कोथिंबीर चांगला बाजार मिळाला आहे तो चांगल्या प्रतीचा असून प्रतवारी केलेला होता,त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी बाजारपेठेत कोथिंबीर, मेथी विक्रीसाठी आणताना जुडा व्यवस्थित बांधून प्रतवारी करून आणावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती संजय काळे व उपसभापती प्रकाश ताजणे यांनी केले आहे.

हेही वाचा :

सातारा : दहशतवाद्यांनी चांदोली धरण परिसराची रेकी केल्याने खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी-शरद पवार आठ वर्षांनी एकाच व्यासपीठावर

Back to top button