

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील युवक हा शरद पवार यांच्या विचारधारेशी बांधील आहे. या बदललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या राजकीय व सामाजिक राजकीय चळवळीची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी शनिवारी (दि.29) सांगितले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेनुसार काम करणार्या वरील पदांवरील पदाधिकार्यांना लवकरच नवीन जबाबदार्या देण्यात येणार आहेत. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नवीन शहर कार्यकारिणी स्थापन करण्यात येणार आहे, असे शेख यांनी सांगितले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरातील सर्व कार्याध्यक्ष, सर्व विधानसभा अध्यक्ष व शहर कार्यकारिणीतील उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, संघटक, चिटणीस व सदस्य, प्रभागाध्यक्ष, वार्डअध्यक्ष यांना पदमुक्त करण्यात आले आहे.
हेही वाचा