नानगाव येथे शेतमजूरावर बिबट्याचा हल्ला | पुढारी

नानगाव येथे शेतमजूरावर बिबट्याचा हल्ला

राजेंद्र खोमणे

 

नानगाव (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : नानगाव( ता.दौंड) येथील मांगोबामाळ खळदकर वस्ती येथे रहात असलेले शेतमजूर काशिनाथ बापू निंबाळकर( वय ६५) यांच्यावर शनिवार दि.२९ रोजी रात्री अकराच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतमजूर काशिनाथ निंबाळकर हे जखमी झाले असुन त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.हल्ल्याच्या वेळी प्रसंगावधान सांभाळल्याने शेतमजूराचे प्राण वाचले.

या भागात गेली अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे.अनेकदा छोट्या मोठ्या जनावरांवर बिबट्यांनी हल्ले केले असून अशा हल्ल्यात प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.मात्र माणसावर पहिल्यांदाच असा हल्ला झाल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

अहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग, 80 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले

Green Card : अमेरिकेत कायमस्वरुपी मुक्काम करायचा का?

Back to top button