पुणे : पदवी प्रमाणपत्रासाठी भरा अर्ज | पुढारी

पुणे : पदवी प्रमाणपत्रासाठी भरा अर्ज

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत नुकताच 122 वा पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर विद्यापीठाचा 123 वा पदवीप्रदान समारंभ सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात होणे अपेक्षित आहे. या पदवीप्रदान समारंभासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात येत असून, विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत विनाविलंब शुल्कासह, तर 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागातर्फे देण्यात आली आहे.

ऑक्टोबर / नोव्हेंबर 2022 व जून / जुलै 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी convocation.unipune.ac.in विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑक्टोबर / नोव्हेंबर 2022 व जून / जुलै 2023 मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहे. अर्जाचा नमुना, शुल्क आदीबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली आहे. पदवी, पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

धरणसाखळीत गतवर्षाइतके पाणी ; पुणेकरांसह जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा

सांगली : जिल्ह्यात अनेक लॅबोरेटरिज् अनधिकृत

 

Back to top button