पुणे: चासकमान धरणातून 4340 क्युसेक्स वेगाने विसर्ग

पुणे: चासकमान धरणातून 4340 क्युसेक्स वेगाने विसर्ग

कडूस (पुणे), पुढारी वृत्तसेवा: खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत विशेषतः भीमाशंकर अभयारण्य परिसरात संततधार पडत असलेल्या पावसाने ८.५३ टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण ९३.२१ टक्के भरले आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा ७.०६ टीएमसी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता प्रत्येकी २० सेटिंमीटरने उघडून धरणाच्या सांडव्याद्वारे ३ हजार ४९० क्युसेक वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर कालवा व सांडव्याद्वारे नदीपात्रात मिळून ४३४० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती उपविभागिय अभियंता डी. एस डिगिकर, शाखा अभियंता एस. एस. सुसुंद्रे यांनी दिली.

चासकमान धरणामध्ये ५५०० दशलक्ष घनमीटर एवढी पाण्याची आवक होत असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत मागील २४ तासांत २ मिलिमिटर तर एकूण २९६ मीलिमिटर मिलिमीटर इतकी नोंद करण्यात आली आहे. पावसाच्या अंदाजानुसार चासकमान धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येत आहे.
धरणामधून एकूण ३४९० क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आल्यामुळे धरणाच्या खालील बाजूस असलेला विजनिर्मीती प्रकल्प कार्यान्वित झाला असून तासाला ४ मँगावँट विज निर्मीती सुरू झाली आहे. मागील वर्षी १६ जुलै रोजी धरण ९१ टक्के भरल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले होते. चासकमान धरणात सद्या ९३.२१ टक्के साठा झाला असून पाणी पातळी ४४८. ७१आहे तर एकूण साठा २२७.१३ आहे तर उपयुक्त साठा१९९.९४ झाला आहे.

कळमोडी धरण (दि. १६) जुलै रोजी शंभर टक्के भरले आहे. तर शुक्रवारी (दि. २८) सकाळी भामा आसखेड धरण ६८.९३ टक्के भरले आहे. भामा आसखेड धरणात मागील वर्षी याच तारखेला ९२.७८ टक्के इतका साठा शिल्लक होता.

यावर्षी चासकमानचा पाणीसाठा

२२ जुलै : ५०%
२५ जुलै : ७२%
२६ जुलै : ८०%
२८ जुलै : ९२ %

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news