इंद्रायणी नदीला पूर ; आळंदीत भक्ती सोपान पूल पाण्याखाली | पुढारी

इंद्रायणी नदीला पूर ; आळंदीत भक्ती सोपान पूल पाण्याखाली

आळंदी : पुढारी वृत्तसेवा :  आळंदी परिसरात वरुणराजाने दमदार हजेरी लावली असून, संततधार पावसाने इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. येथील नदीवरील भक्ती-सोपान पूल पाण्याखाली गेला आहे. मावळात आंद्रा धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तसेच इंद्रायणी नदीचे पाणलोट आणि लाभ क्षेत्रात होत असलेल्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. या पुराच्या पाण्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला असून, पुराचे पाणी भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने पुंडलिक मंदिर दर्शन बंद झाले आहे. भागीरथी कुंड व घाटावरील पायर्‍या पाण्याखाली गेल्या आहेत. इंद्रायणी नदीच्या दुतर्फा रस्ते आणि भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेल्याने लगतच्या पूर्व किनार्‍यावरील रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने रहदारीस धोका निर्माण झाला आहे.

वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी मोबाईलमध्ये सेल्फी घेण्यासाठी नागरिक इंद्रायणी नदी घाटावर गर्दी करताना दिसून येत आहेत. पुलावर वाहने थांबवून वाहनचालकदेखील पुराचे पाणी पाहताना दिसत होते. दरम्यान, मावळात आंद्रा धरण परिसरात सलगच्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली आहे. यामुळे इंदोरी, निघोजे, देहू, खालुंब—े, चिखली, मोशी, मोई, कुरुळी, चिंबळी, डुडुळगाव, आळंदी, चर्‍होली गावचे नदीकाठ पुराने भरून गेले असून, नदी दुथडी भरून वाहत आहे.

हेही वाचा :

अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्यांसाठी पीक स्पर्धा

बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कमळ हाती घेणाराच

Back to top button