

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुलीची छेड काढल्याच्या रागातून झालेल्या वादातून टोळक्यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत दांडेकर पुलावर घडला. एका 16 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात चार जणांना ताब्यात घेऊन अभिजित पाटील याच्यासह आठ जणांच्या टोळक्यावर पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, परपस्परविरोधी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात नव्या वाडकरसह त्याच्या सहा ते आठ साथीदारांवर पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका 35 वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जनता वसाहत परिसरात घडला. दरम्यान, दोन्ही गुन्ह्यांतील काही आरोपींना अटक करण्यात आल्याचे व काही जण अल्पवयीन असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले.
बोलणे थांबविल्याचा राग मनात धरून 23 वर्षीय तरुणाने युवतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत 19 वर्षीय युवतीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 22 जुलैला सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली. फिर्यादी मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मात्र मुलीच्या घरच्यांनी तिला त्याच्याशी बोलू नको, असे सांगितल्यानंतर पीडित युवतीने बोलणे थांबविले होते.
हेही वाचा