पिंपरी: वीज बचतीसाठी महापालिकेचे पाऊल; मोशन सेन्सरमुळे दिवे, एसी आपोआप होणार बंद

पिंपरी: वीज बचतीसाठी महापालिकेचे पाऊल; मोशन सेन्सरमुळे दिवे, एसी आपोआप होणार बंद
Published on
Updated on

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: विजेचा अपव्यय टाळण्यासाठी आणि आवश्यक त्याठिकाणी विजेची बचत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाऊल उचलले आहे. महापालिकेची सर्व प्रशासकीय कार्यालये, सर्व रुग्णालये, नाट्यगृहे आदी ठिकाणी वीज बचतीच्या दृष्टीने गती संवेदक यंत्रणा म्हणजेच मोशन सेन्सर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणी नसेल, तेव्हा दिवे, पंखे, एसी व इतर यंत्रणा मोशन सेन्सरमुळे आपोआप बंद होणार आहे.

महापालिका भवनात दिवाबत्तीसाठी वीज वितरण व्यवस्था केलेली आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष वीजेचा वापर आवश्यक नसताना देखील वीजेचे दिवे चालू असतात. दालनात अधिकारी व कर्मचारी नसताना पंखे, दिवे तसेच एसी यंत्रणा सुरू असते. तसेच, इमारतीच्या पॅसेजमध्ये कोणी नसताना पंखे सुरू असतात. त्यामुळे नाहक वीज वाया जाते. वीजेचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी मोशन सेन्सर बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नाहक होणारा वीजेचा अपव्यय टाळण्यासाठी मोशन सेन्सरचा वापर केला जाणार आहे. व्यक्तीच्या हालचालीनुसार दिवे चालू किंवा बंद करणारी स्वयंचलित यंत्रणा या माध्यमातून कार्यान्वित होणार आहे. महापालिकेच्या सर्व प्रशासकीय इमारती, रुग्णालये, नाट्यगृहांच्या आतील परिसर, स्वच्छतागृहांमध्ये मोशन सेन्सर बसविले जाणार आहे. विद्युत विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून अशी ठिकाणे निवडली जाणार आहेत. अशा यंत्रणेमुळे वीजेचा नाहक होणारा वापर टाळण्यास मदत होईल. तसेच, वीजेची बचत होणार आहे, असे विद्युत विभागाचे सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी सांगितले. यासंदर्भात महापालिकेच्या सर्व विभागांना सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news