पिंपरी : कट मारल्याच्या कारणावरून मारहाण

पिंपरी(पुणे) : कट मारल्याचा जाब विचारल्याने चौघांनी मिळून एकास मारहाण केली. तसेच, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या अन्य तिघांनादेखील मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी साडे अकराच्या सुमारास भैरवनाथ मंदिराजवळ, चिखली येथे घडली. अफरोज अहमद खान (36, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कुंदन बालघरे, संभा बालघरे, महेश बालघरे, गोविंद बालघरे (सर्व रा. कुदळवाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मफतू आम्हाला दुचाकीवरून कट कसा काय मारलाफफ असे म्हणत फिर्यादी यांचा पुतण्या आफताब यांना शिवीगाळ केली. तसेच, दमदाटी करून त्याला मारहाण केली. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी आणि आसिफ खान, आरिफ खान हे गेले असता आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारला. तसेच, आसिफ खान आणि आरिफ खान यांना दुखापत करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
हेही वाचा
पुणे : स्वातंत्र्यलढ्यातील बैठकीची जागा बनवलीय उत्पन्नाचे साधन!
पिंपरी : रेल्वे स्थानकात भिकारी, मद्यपींचा वावर; महिलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
पिंपरी : नवीन पालिका भवन नको, दररोज पाणी द्या; मनसेचे महापालिकेत धरणे आंदोलन