

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेर्या पूर्ण होऊन दि.16 पासून विशेष फेरी सुरू झाली आहे. त्यासाठी विशेष फेरीत पसंतीक्रम भरण्यासाठी तसेच अर्जात दुरुस्ती करण्यासाठी आज दि.20 रोजी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर 21 ते 23 जुलैदरम्यान पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून, सोमवार दि.24 रोजी विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत अकरावी प्रवेशासाठी 325 महाविद्यालयांत 97 हजार 187 कॅपच्या तसेच 17 हजार 963 कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 1 लाख 15 हजार 150 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी आतापर्यंत झालेल्या तीन फेर्यांमध्ये कोटा आणि कॅप मिळून 44 हजार 214 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशासाठी 71 हजार 026 जागा उपलब्ध आहेत. अकरावी प्रवेशासाठी 99 हजार 585 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 89 हजार 231 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले आहेत. तर 26 हजार 644 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विशेष फेरीत प्रवेशासाठी 26 हजारांवर विद्यार्थीच इच्छुक असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हे ही वाचा :