पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या दुर्गम भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश | पुढारी

पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या दुर्गम भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात कालपासून संततधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाने वाहतूक आणि सामान्य जनजीवनावर परिणाम झाला.  पुण्यासह घाटमाथ्यावर 25 जुलैपर्यंत हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी काल रात्री घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भागातील अंगणवाड्याही आज आणि उद्या बंद ठेवल्या जाणार आहेत.

या आदेशात…

  • ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सीडीपीओ यांनी परिसरात असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील.
  • हा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित व खाजगी शाळांना लागू आहे.
  • इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या सामान्यपणे चालू राहतील, असेही म्हटले आहे.

हेही वाचा :

kolhapur rains : तेरवाड, शिरोळ बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली

अतिवृष्टीमुळे गरजेनुसार शाळांना सुटी जाहीर करा ; शिक्षण आयुक्तांचे निर्देश

Back to top button