धक्कादायक ! चकना मागितल्याने केला खून | पुढारी

धक्कादायक ! चकना मागितल्याने केला खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बिबवेवाडी भागातील सरगम चाळीच्या आवारात दारू पिताना चकना मागितल्याने दोघांनी एकाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोन जणांना बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केतन शाम टेमकर (वय 19), सणस (वय 22, दोघे रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बिबवेवाडी भागातील सरगम चाळ परिसरातील मोकळ्या जागेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.

अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. बिबवेवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग बिबवेवाडी भागात गस्त घालत होते. त्या वेळी टेमकर आणि सणस यांनी एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने टेमकर आणि सणसला पकडले. चौकशीत दोघांनी सरगम चाळीच्या परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सविता ढमढेरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय पतंगे, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग अंमलदार संतोष जाधव, सतीश मोरे, शिवाजी येवले, तानाजी सागर, अतुल महांगडे यांनी ही कारवाई केली.

हे ही वाचा :  

अमेरिका पोळतोय! तापमान धोक्याच्या पातळीवर

टीका करणार्‍यांनी आत्मपरीक्षण करावे : खा. उदयनराजे

Back to top button