पुणे जिल्ह्यातील भागडी येथे बिबट्या अडकला पिंजऱ्यात | पुढारी

पुणे जिल्ह्यातील भागडी येथे बिबट्या अडकला पिंजऱ्यात

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  भागडी (ता. आंबेगाव) येथील गवारी -आदक मळ्यात वनविभागाने शनिवारी (दि. १५) सायंकाळी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. अजूनही तेथे दोन बिबटे असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. एक बिबट्या अडकल्याने भागडी ग्रामस्थांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भागडी गावाच्या पश्चिम दिशेला गवारी-आदक मळा आहे. तेथे संदीप रामभाऊ आदक हे शेतकरी राहतात. गेली दीड महिन्यांपासून या वस्तीत बिबट्यांचा वावर आहे.

अनेक वेळा शेतकऱ्यांना बिबट्यांचे दर्शन झालेले आहे. शनिवारी (दि. १५) सकाळी संदीप रामभाऊ आदक हे शेतकरी वीजपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना एकाच वेळी तीन बिबटे दिसून आले. आदक यांनी सरपंच गोपाळ गवारी यांना घटनेची माहिती दिली. सरपंच गोपाळ गवारी यांनी वनपरिक्षेत्रअधिकारी स्मिता राजहंस यांना तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली. त्यानुसार शनिवारी (दि. १५) सायंकाळी वनविभागाने गवारी- आदक मळा येथे पिंजरा लावला. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला.
गवारी-आदक मळ्यात अद्याप दोन बिबटे आहेत. त्यांचा ही वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच गोपाळ गवारी, दिनकर आदक, संदिप आदक आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

हे ही वाचा :

पुण्यात यंदा ‘फिरत्या हौदांची’ सुविधा बंद ! गणेशोत्सवात मूर्तिदान केंद्रांची संख्या वाढवणार

समाविष्ट गावांतील शिक्षक जिल्हा परिषदेलाच मिळावेत; प्रशासनाची राज्य शासनाकडे विनंती

Back to top button