शिंदेवाडी हद्दीत मोठ्या प्रमाणात टेकडीफोड

शिंदेवाडी हद्दीत मोठ्या प्रमाणात टेकडीफोड

खेड शिवापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी (ता. भोर) हद्दीतील डोंगरावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे टेकडीफोड झाली आहे. त्यासाठी महसूल विभागाने ताब्यात घेतलेली जमीन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधलेली सीमा भिंत तोडून डोंगरावर जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता केला आहे. यामुळे भविष्यात पुन्हा 2013 च्या घटनेची पुनरावृत्ती होते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सन 2013 मध्ये या भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला होता.

टेकडीफोड केल्याने पुणे-सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी हद्दीतील रस्त्यावर माय-लेकीचा जीव गेला होता. त्यानंतर महसूल विभागाने ही जागा ताब्यात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून सीमा भिंत उभारली होती; मात्र आता ही सीमा भिंत महसूल विभागाच्या किंबहुना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने तोडण्यात आली आहे की काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे भविष्यात जर पावसाचा जोर वाढला आणि दुर्दैवी घटना घडली तर याला कोण जबाबदार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
या भागातील नागरिक या टेकडीफोडमुळे भयभीत झाले आहेत. यावर संबंधित प्रशासन आता काय भूमिका घेईल, यावर शिवगंगा खोर्‍याचे लक्ष लागले आहे.

संबंधित ठिकाणी जाऊन पंचनामा केला आहे. ही बाब पीएमआरडीए संबंधित आहे. तसे पत्र त्यांना दिले असून, दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल.

सचिन पाटील, तहसीलदार, भोर

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news