अबब! सहा लाख एक्कावन्न हजाराला बैलजोडी | पुढारी

अबब! सहा लाख एक्कावन्न हजाराला बैलजोडी

धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रोड परिसरातील धायरी येथील एका हौशी शेतकर्‍याने खिलारी देखणी बैलजोडी तब्बल सहा लाख एक्कावन्न हजार रुपयांना खरेदी केली आहे. पांडुरंग चौधरी असे या प्रगतिशील शेतकर्‍याचे नाव आहे. केवळ हौसेपोटी त्यांनी गडहिंग्लज येथे जाऊन काशीनाथ शंकर बेळगुद्री या शेतकर्‍याकडून ही बैलजोडी खरेदी केली. बैल आणि शेतकरी यांचे एक अतूट असे नाते असते. शेतकरी अतिशय प्रेमाने आपल्या बैलांना सांभाळत असतात. त्यांच्यावर जिवापाड प्रेम करीत असतात.

हेच प्रेमाचे नाते अखंड टिकावे व ही परंपरा अशीच चालू राहावी, या हेतूने चौधरी यांनी ही बैलजोडी खरेदी केली आहे. त्यांनी या जोडीचे सरपंच – आमदार असे नामकरण केले आहे. पांढरी शुभ्र व अत्यंत देखणी असलेली ही बैलजोडी पंचक्रोशीतील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

जातिवंत खिलारी अशी ही बैलजोडी आहे. हौस म्हणून आम्ही ही बैलजोडी खरेदी केली आहे. या बैलांची उंची आणखी चार-पाच इंच वाढणार आहे. हे बैल सहा दाती आहेत. त्यांच्यासाठी प्रशस्त असा गोठा आहे. गोठ्यात मॅट, पंखे, पाणी, त्यांना वैरणीसाठी गव्हाणी इत्यादी सुविधा करण्यात आल्या आहेत.

-पांडुरंग चौधरी, प्रगतिशील शेतकरी

हेही वाचा

कोल्हापूर: तरुणाची फायनान्स कार्यालयात तोडफोड

पुणे : रिक्षाचालकाने स्वत:वर ब्लेडने केल्या जखमा

पोलिसांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून अट्टल गुन्हेगाराची हत्या

Back to top button