रेल्वेच्या पुणे विभागात 17 वॉटर व्हेंडिंग मशिन | पुढारी

रेल्वेच्या पुणे विभागात 17 वॉटर व्हेंडिंग मशिन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांना पिण्यासाठी शुध्द आणि थंडगार पाणी मिळावे, याकरिता रेल्वे प्रशासनाकडून पुणे विभागात 17 नवे वॉटर व्हेंडिंग मशिन बसविण्यात येणार आहे. यातीलच 2 मशिन पुणे रेल्वे स्थानकावर बसविले जातील. यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

पुणे रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भातील कार्यवाही सुरू असून, लवकरच प्रवाशांना या मशिनद्वारे शुध्द पाणी मिळणार आहे. प्रशासनाने यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू केली असून, ती पूर्णत: ऑनलाइन पध्दतीने सुरू आहे. येत्या दोन महिन्यांच्या आत या मशिन पुणे स्थानकावर पाहायला मिळतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.

आयआरसीटीसीचे मशिन टाकले काढून

रेल्वे स्थानकांवर यापूर्वी बसविण्यात आलेले वॉटर व्हेंडिंग मशिन आयआरसीटीसीकडून बसविण्यात आले होते. मात्र, ते आता काढून टाकले आहे. रेल्वे स्वत:च यासंदर्भात ई-ऑक्शनद्वारे या व्हेंडिंग मशिन बसविणार आहे. पुणे स्थानकावर 9 मशिन बसविण्याचे नियोजन होते. मात्र, इतर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनाच उभे राहण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे मशिन फक्त प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर बसविण्यात येणार आहेत.

रेल्वे प्रवाशांना स्थानकावर प्रवाशांना शुध्द पाणी मिळावे, याकरिता वॉटर व्हेंडिंग मशिन बसविण्याचे नियोजन आम्ही केले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर 2 आणि विभागातील इतर स्थानकांवर 15 मशिन 2 महिन्यांत बसविण्यात येतील.

– डॉ. रामदास भिसे,
जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

हेही वाचा

बाप-लेकाला हिरावले; माय-लेकीचे अवसान गळाले .. आता जगायचं तरी कुणासाठी?

इस्रायलच्या नेगेव्ह वाळवंटात 2500 वर्षांपूर्वीचे सांगाडे

सातारा : ऊस उत्पादकांना प्रति टन मिळणार 2900 दर

Back to top button