पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक 15 जुलैनंतर पूर्ववत | पुढारी

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक 15 जुलैनंतर पूर्ववत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीचे काम सुरू आहे. एकूण 9 मोठे गर्डर असून, त्यातील 4 गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित 5 गर्डर 15 जुलैपर्यंत टाकण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

एनएचएआयच्या भारतमाला परियोजनेंतर्गत पुणे शहरातील चांदणी चौक जंक्शनवर एकात्मिक संरचना पुलाचे बांधकाम केले जात आहे. या प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून, ते अंतिम टप्प्यात आहे. नवीन एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे (व्हेहीक्युलर ओव्हर पास- व्हीओपी) काम सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतिपथावर आहे. त्या अनुषंगाने हा वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत फक्त मल्टी एक्सेल वाहनांची वाहतूक 3 तासांसाठी बंद केली जाणार आहे. वाहतूक बंद काळात हलकी आणि ट्रक हे सेवा रस्त्याने वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुख्य पुलावरील नऊपैकी 4 गर्डर टाकण्यात आले असून, उर्वरित पाच गर्डर 15 जुलैपर्यंत टाकले जातील. तर लहान गर्डर एकूण 32 असून, त्यापैकी 25 पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित सात गर्डर लवकरच पूर्ण होतील.

रात्री जड वाहतूक बंद

गर्डर उभारणीसाठी राष्ट्रीय महामार्ग क्र.48 वर 15 जुलैपर्यंत रात्री 00.30 (सोमवारी रात्री 12.30 पासून) ते पहाटे 3.30 पर्यंत तीन तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. यादरम्यान जड वाहतूक मुंबई एक्स्प्रेस-वे, तळेगाव टोल नाका व मुंबई-पुणे जुना महामार्ग, सोमाटणे टोल नाका या ठिकाणी थांबवली जात आहे. साता-याकडून येणारी वाहने खेड-शिवापूर टोल नाका येथे थांबविण्यात येत आहेत.

हेही वाचा

बँक फोडण्याचा डाव फसला; भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न

चांदोली धरणात 7,083 क्यूसेक पाण्याची आवक

दिवे : साहेब काही करा, पण आम्हाला पाणी द्या; नागरिकांची आर्त हाक

Back to top button