खेड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा निर्णय पक्का, शरद पवारांना दे धक्का ..! | पुढारी

खेड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा निर्णय पक्का, शरद पवारांना दे धक्का ..!

राजगुरूनगर :पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या सह त्यांच्या समर्थक अथवा कट्टर कार्यकर्त्यांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर राहायचा निर्णय निश्चित केला आहे.मंगळवारी( दि. ४) राजगुरूनगर येथील आमदार मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी अश्या जबाबदार कार्यकर्त्यांची विशेष बैठक झाली.रात्री उशिरापर्यंत चर्चा विनिमय करून हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आज म्हणजे बुधवारी (दि. ५) अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सर्वच कार्यकर्ते सकाळी मुंबईला रवाना झाले असल्याची माहिती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर पाटील यांनी दिली.

तर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपल्याला राजकीय अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा सहकार्य केले. आत्ताच्या वेळेपेक्षा अजित पवारांना आपण पहिल्यापासूनच स्वीकारले आहे.कालच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले असे सांगितले.याशिवाय शरद पवार यांच्या बैठकीला तालुक्यातून एकही कार्यकर्ता उपस्थित राहणार नसल्याचा दावा आमदार मोहिते पाटील यांनी केला. एकूणच खेड तालुक्यातील राष्ट्रवादीचा प्रमुख गट हा आमदार दिलीप मोहिते यांच्या सोबत राहुन अजित पवारांच्या बरोबर गेला आहे. नजीकच्या किंवा पुढच्या काळात आमदार मोहिते पाटील यांना डावलून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर तालुक्यातून कोण जाणार याकडे देखील तालुक्यांचे लक्ष लागुन राहणार आहे.

देश,राज्य आणि पुणे जिल्ह्याच्या सत्ताकारणाचे अनेक वर्षे केंद्रबिंदु असलेले बारामतीचे ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ पवार घराण्यात ऊभी फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर या नेत्यांचा पक्ष आसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. विशेषत्वाने पवारांच्या घरच्या स्पिचवर एकमेकांना टार्गेट केले जाते आहे. काका पुतण्याच्या सत्तेच्या सारीपाटात स्थानिक कार्यकर्ते पातळीवर कमी अधीक प्रमाणात विभाजन होताना दिसत आहे. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका गृहीत धरून तालुक्या, तालुक्यांत अनेक उलथा – पालथी होणार आहेत.

हे ही वाचा : 

पुणे जिल्ह्यातील अशोक पवार वगळता सर्व आमदार अजित पवार यांच्याकडे

पुणे : अंदाजासाठी अजित पवार समर्थक कराड दौर्‍यात सहभागी !

Back to top button