डॉ. रामोड कारागृहात; पाच जिल्ह्यांतील जमिनीसंदर्भातील दाव्यांच्या सुनावण्या खोळंबल्या ! | पुढारी

डॉ. रामोड कारागृहात; पाच जिल्ह्यांतील जमिनीसंदर्भातील दाव्यांच्या सुनावण्या खोळंबल्या !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागाचा अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड हा आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात न्यायालयालीन कोठडीत आहे, तर दुसरीकडे पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील जमिनीसंदर्भातील दाव्यांच्या सुनावण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत.
याचिकाकर्त्यांना ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे. दरम्यान, पुणे विभागाचे अपर आयुक्त म्हणून अण्णासाहेब चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पद्भार स्वीकारला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा दावा रामोड याच्याकडे सुरू होता. या प्रकरणात लाच घेताना त्याला अटक झाली होती.

अपील हाच पर्याय
डॉ. रामोडने अनेक चुकीचे निर्णय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात फायलींची चौकशी करून तो निर्णय बदलण्याचा अधिकार विभागीय आयुक्तपातळीवर कोणालाही नाही. मात्र, निकाल लागल्यानंतर 90 दिवसांच्या आत ज्यांना निकाल मान्य नसेल, त्यांना महसूलमंत्र्यांकडे दाद मागणे हा एकमेव पर्याय आहे, असे विभागीय आयुक्तालयातील अधिकार्‍यांनी सांगितले.

हे ही वाचा :

दोघात तिसरा, मंत्रिपद विसरा; शिंदे गटात नाराजीचे सूर

पुणे : ससूनमध्ये अतितातडीच्या उपचारांसाठी आता ‘टीम कोड ब्लू’

Back to top button