अल्पवयीन मुलाच्या हातात आढळल्या 18 सुया; पुण्यात धक्कादायक प्रकार

अल्पवयीन मुलाच्या हातात आढळल्या 18 सुया; पुण्यात धक्कादायक प्रकार
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात बालनिरीक्षणगृहातून येरवडा मनोरुग्णालयात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा व त्याच्या हातात तब्बल 18 इंजेक्शनच्या सुया आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात येरवडा पोलिसांनी अत्याचार करणार्‍या संबधित 25 वर्षीय एकासह एक परिचारिका व चार सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात 16 वर्षीय मुलाला सुरुवातीला येरवडा येथील बाल न्यायमंडळाच्या निरीक्षणगृहात दाखल केले होते. त्यानंतर त्याला येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते.

तेथे अगोदरच पॉस्कोच्या गुन्ह्यातील एक 25 वर्षांचा युवक दाखल होता. यावेळी 16 वर्षीय मुलावर त्या 25 वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केले. तसेच रुग्णालयातील बॅराकीमध्ये अल्पवयीन मुलगा 26 जून रोजी आराम करत असताना रुग्णालयात काम करणारी एक परिचारीका आणि चार अनोळखी सुरक्षा रक्षकांनी भुलीचे इंजेक्शन दिले. या वेळी त्याच्या डाव्या हाताला दुखापत केली.

त्याच्या घरच्यांनी रुग्णालयात घेऊन गेले. तेथे हाताचा एक्सरे काढला. एक्सरेमध्ये त्याच्या हातात इंजेक्शनच्या अठरा सुया आढळल्या. त्यावरून अत्याचार तसेच अनैसर्गिक कृत्य केल्याचा येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गाताडे करीत आहेत.

आम्हाला अद्याप कोणतीही विचारणा झालेली नाही. संबंधित मुलाला बालसुधारगृहातून येरवडा मनोरुग्णालयात उपचारांसाठी पाठविले होते. कायदेशीर समितीने संपूर्ण तपासणी केल्यावर पाच दिवसांपूर्वी मुलाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. तरी या प्रकरणात आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करू.

– डॉ. हरिणाक्षी गोसावी,
अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक, येरवडा मनोरुग्णालय.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news