वळसे-पाटलांनी शरद पवारांना सोडल्याने अनेकांना धक्का | पुढारी

वळसे-पाटलांनी शरद पवारांना सोडल्याने अनेकांना धक्का

मंचर(पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निष्ठावंत आणि अनेक वर्षे शरद पवार यांचे स्वीय सहायक राहिलेले आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि अनेक खात्यांचे मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांना सोडून सत्तेत सहभागी झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून, आंबेगाव तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते संभ्रमात पडल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

कायमच शरद पवारसाहेबांना दैवत म्हणणारे दिलीप वळसे पाटील अजित पवारांसमवेत सोबत मंत्रिमंडळात सहभागी झाल्याने आंबेगाव तालुक्यातील ही जुन्या जाणत्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये ही संभ्रमाची स्थिती असून, यामागे नक्की काय कारण घडले हा प्रश्न त्यांना पडला आहे. वळसे पाटील हे कधीही शरद पवारसाहेबांची साथ सोडणार नाही याबाबत कार्यकर्ते अतिशय ठाम होते. परंतु शरद पवारांची साथ सोडल्याने नक्की राजकारणात काय घडेल याचा नेम नाही. हीच भावना सध्या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली.

हेही वाचा

शरद पवार यांचे पुन्हा एक अर्धसत्य ! राष्ट्रवादीच्या मोठ्या खेळीमागे विकासाची पोकळी

पुणे : चार टोळ्यांतील 10 चोरांना अटक तीन अल्पवयीन साथीदारही ताब्यात

सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्‍या तर आश्चर्य वाटायला नको : राज ठाकरे

Back to top button