कुरुलकर प्रकरण : अनोळखी सौंदर्यवतींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका!

कुरुलकर प्रकरण : अनोळखी सौंदर्यवतींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका!
Published on
Updated on

पुणे : पुणे संरक्षण दलाच्या डीआरडीओतील प्रमुख शास्त्रज्ञ प्रदीप मोरेश्वर कुरुलकर हा पाकिस्तानने पाठविलेल्या 14 पैकी एक असलेल्या झारादास गुप्ता नावाचा गुप्तहेर ललनेच्या जाळ्यात अडकताच देशातील सर्वच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना अलर्ट करणारा संदेश दिला आहे. भारत हा पाकिस्तानपेक्षा खूप पुढे निघून गेल्याने आपल्या देशातील महत्त्वाच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांना अडकवण्यासाठी नानाविध क्लृप्त्या आयएसआयकडून चालवल्या जात आहेत. पाकिस्तानच्या एजंट म्हणून काम करणार्‍या 14 सौंदर्यवतींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यातच पुण्यातील डीआरडीओचा शास्त्रज्ञ कुरुलकर अडकला असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा भारतीय लष्करी अधिकार्‍यांसोबत नानाविध प्रकारचे प्रयत्न करून भारतीय अधिकार्‍यांना टार्गेट करीत आहेत. यात संरक्षण दलासह पोलिस, शास्त्रज्ञ व उच्चपदस्थ अधिकारी यांना ओढत आहे. प्रामुख्याने फेसबुक व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, लिंक्डइनवर अनेक बनावट प्रोफाइल तयार करून टाकली जात आहेत. यात त्यांनी 14 सौंदर्यवती ललनांचे फोटो टाकले आहेत. विविध सरकारी विभागांतील माहितीचा डेटा हस्तगत करून तो नष्ट करणे असा आहे. अशाच प्रकारे पुण्यातील डीआरडीओतील शास्त्रज्ञ प्रदीप मोरेश्वर कुरुलकर हा ललनाच्या जाळ्यात अडकला.

'डीआरडीओ'ला ललनांचा विळखा!

पुण्याच्या दिघी येथील डीआरडीओतील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जाळ्यात अडकताच पाकिस्तानी ललनांचा थेट वावर वाढला होता. त्या ललनेच्या प्रेमाखातर त्याने मिसाईल व रॉकेटचे तंत्रज्ञान दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी अत्यंत गोपनीय आदेश देशातील सर्वच जिल्हाधिकार्‍यांना व पोलिसांना बजावले असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

देशद्रोह गुन्ह्यासाठी काँग्रेसचे आज आंदोलन

देशद्रोह कृत्य केल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही कुरुलकरला आरएसएस, भाजपकडून वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या विरोधात एटीएस कार्यालयासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्या नेतृत्वात आज निदर्शने करण्यात येणार आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news