राज्यातील ‘या’ भागात 6 जुलैपर्यंत मुसळधार; मान्सूनने 6 दिवस आधीच संपूर्ण देश व्यापला | पुढारी

राज्यातील 'या' भागात 6 जुलैपर्यंत मुसळधार; मान्सूनने 6 दिवस आधीच संपूर्ण देश व्यापला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मान्सूनने यंदा सहा दिवस आधीच संपूर्ण देश व्यापला असून तो आता राजस्थान, पंजाबसह हरियाणात प्रगती करीत आहे. दरम्यान राज्यात पाऊस वाढत असून, 6 जुलैपर्यंत कोकणात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दरवर्षी मान्सून संपूर्ण देश गाठण्यास 8 जुलै उजाडतो. मात्र यंदा मान्सून अतिशय वेगाने विदर्भापासून ते काश्मीरपर्यंत गेला. मात्र गेल्या दहा दिवसांपासून तो राजस्थान, पंजाब सीमेवर थांबला होता. रविवारी (दि.2 ) तो पुढे सरकला. सहा दिवस आधीच संपूर्ण देश काबीज केला.

दक्षिण भारतात अतिवृष्टी, महाराष्ट्रात पाऊस वाढणार

महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने दक्षिण भारताला 6 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसणार असून कोकणात 6 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्याला आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व विदर्भात 4 ते 6 पर्यंत मसुळधारेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात 24 तासांत पडलेला पाऊस

कोकण : पेण 130, मोखेडा 120, जव्हार, तलासरी 110, विक्रमगड, काणकोण 100, वाडा 90, भिवंडी, मुरबाड, माथेरान, सावांतवाडी, लाांजा प्रत्येकी 80, चिपळूण, दोडामार्ग, तळा, कणकवली, सुधागड, पाली, माणगाव, वाकवली, दापोली, पोलादपूर प्रत्येकी 70, संगमेश्वर देवरूख, पनवेल, खेड, फोंडा, कुडाळ, सांगे प्रत्येकी 60, वैभववाडी, पालघर, राजापूर, महाड, शहापूर, खालापरू, मडगाव, मोरगाव, कर्जंत, कल्याण प्रत्येकी 50, मध्य महाराष्ट्र: पेठ 100, इगतपुरी 90, त्र्यंबकेश्वर 80, महाबळेश्वर, गगनबावडा 70,हर्सुल, ओझरखेडा, राधानगरी 60, लोणावळा 50, शाहुवाळी, पौड, मुळशी 40, विदर्भः बुलढाणा 10
घाटमाथा : वाणगाव 101, कोयना (पोफळी) 95, कोयना (नवजा) 92,अम्बोने 90, दावडी 85, खोपोली, डुगां रवाडी 77, ताम्हीणी, भिरा 64, वळवण 59, लोणावळा 58, ठाकूरवाडी 49, लोणावळा (टाटा), खांद 42,
धारावी 27.

असे आहेत इशारे

कोकण ः 3 ते 6 जुलै (अतिवृष्टी)
मध्य महाराष्ट्र ः 3 ते 6 जुलै (मुसळधार)
विदर्भ ः 3 ते 6 जुलै (मुसळधार)
मराठवाडा 4 जुलै (मुसळधार)

हेही वाचा

सातार्‍यातील आमदारांचे तळ्यात मळ्यात; देवगिरीवर पोहचल्यावरच दादांच्या बंडाची माहिती

अजित पवारांच्या धक्क्याने महाविकास आघाडीला सुरुंग

सातारा : दूध भेसळप्रकरणी 9 जणांना अटक; केमिकलसह वाहने जप्त

Back to top button