पंढरीच्या वारीत पुण्यातील नांदेडकर दिंडी स्वच्छतेत दुसरी | पुढारी

पंढरीच्या वारीत पुण्यातील नांदेडकर दिंडी स्वच्छतेत दुसरी

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पंढरीच्या आषाढी वारीत महिला व वारकर्‍यांसाठी सिंहगड रस्त्यावरील नांदेड येथील नांदेडकर मंडळी दिंडीने सुसज्ज फिरत्या स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून दिली. यंदाच्या आषाढी वारीत स्वच्छतेबद्दल सर्व पालखी-दिंड्यांत नांदेड येथील दिंडीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्य सरकारच्या वतीने या दिंडीचा 75 हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.

संत श्री ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यात माउलींच्या रथापुढे 15 क्रमांकांची दिंडी म्हणून नांदेडकर मंडळींची दिंडीला मान आहे. दिंडीला माउलींच्या पालखी सोहळ्यात स्वच्छतेबद्दल प्रथम व सर्व पालखी सोहळ्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. दिंडीचालक ह .भ .प .पांडुरंग महाराज शिंदे गुरव व वारकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. सुसज्ज फिरते स्वच्छतागृह उभारण्यासाठी तुषार कारले, रूपेश घुले, अजित वाल्हेकर, ज्योती कोडितकर, शशिकला कोरडे, राजेंद्र देशमुख, जनाबाई दांगट, बापुसाहेब दळवी, विजय गायकवाड, राजेंद्र दागंट आदी भाविकांनी मोलाचे योगदान दिले.

नांदेडकर मंडळी दिंडीने यंदा संत श्री ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यात फिरत्या स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून दिली. यामुळे महिला वारकर्‍यांची आषाढी वारीत स्वच्छतागृहाअभावी होणारी गैरसोय दूर झाली आहे. राज्य सरकारने या उप्रकमाचा सन्मान केला आहे.

-रूपेश घुले,
माजी उपसरपंच, नांदेड.

हेही वाचा

हडपसर : ससाणेनगर भागातील रस्त्यांची दुरवस्था

नगर : मेजर बाबासाहेब चौधर शहीद ; निपाणी जळगावात शासकीय इतमामात अंत्यसंकार

Back to top button