नगर : मेजर बाबासाहेब चौधर शहीद ; निपाणी जळगावात शासकीय इतमामात अंत्यसंकार

नगर : मेजर बाबासाहेब चौधर शहीद ;  निपाणी जळगावात शासकीय इतमामात अंत्यसंकार

कोरडगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव येथील मेजर बाबासाहेब पांडुरंग चौधर यांचा 24 जूनला रस्ता अपघात झाला होता. आठ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारदामान शुक्रवारी (दि.30) त्यांचे निधन झाले. निपाणी जळगाव येथे शनिवारी (दि.1) शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आर्मी एअर डिफेन्स मिसाईल 511 बटालियन रेजिमेंट कंम्पोझिट, बबीना रोड, झाशी उत्तर प्रदेश येथे ते कार्यरत होते. त्यांनी सैन्यदलात 22 वर्षे सेवा केली. शासकीय वाहनाने त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी पाथर्डी तहसील कार्यालय येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांची शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर निपाणी जळगाव येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय रक्ताटे, बंडू पठाडे, सरपंच नितीन गर्जे, सरपंच अनिल ढाकणे आदींनी मेजर चौधर यांना श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हा सैनिक बोर्डाचे कॅप्टन ज्ञानदेव गुंजाळ, हवालदार विकास ठाकरे, नायब सुभेदार नंदकिशोर पवार, नायब सुभेदार नंदकिशोर भणगे, अंकुश भोई, पाथर्डी माजी सौनिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष मेजर अशोक एकशिंगे, पाथर्डीचे पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांच्या टिमने शासकीय मानवंदना दिली. यावेळी परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. अत्यंत हुशार आणि मनमिळावू स्वभाव असलेले मेजर बाबासाहेब चौधर यांचा तालुक्यामध्ये मोठा मित्र परिवार आहे.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news