कुंडमळा येथे तळेगाव पोलीस स्टेशनने पर्यटकांसाठी लावले धोक्याच्या सूचनांचे फलक | पुढारी

कुंडमळा येथे तळेगाव पोलीस स्टेशनने पर्यटकांसाठी लावले धोक्याच्या सूचनांचे फलक

तळेगाव दाभाडे (पुणे): मावळ तालुक्यातील इंदोरी जवळ शेलारवाडी नजीक कुंडमळा या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असते . या ठिकाणी पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील तसेच मावळातील अनेक भागातून नागरिक निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी येथे येत असतात. परंतु, कुंडमळा हे ठिकाण निसर्गरम्य असले तरी अतिशय धोकादायक आहे. येथे आलेल्या अनेक पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

नुकताच पावसाळा सुरु झाला असल्यामुळे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने धोक्याची जाणीव करुन देणारे फलक शनिवारी लावण्यात आले असून तेथे पोलीस बंदोबस्तही ठेवलाआहे. इंद्रायणी नदीपात्रात उतरून कोणीही फोटो काढू नये, सेल्फी काढू नये तसेच हे ठिकाण धोकादायक असून या ठिकाणी अनेक व्यक्तींचा बुडून मृत्यू देखील झालेला आहे, अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आहेत.

यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्या समवेत उपनिरीक्षक मारुती मदेवाड, पोलीस नाईक प्रशांत वाबळे, पोलीस नाईक किसन कोळप, पोलीस कॉन्स्टेबल बाबाराजे मुंडे उपस्थित होते.

हेही वाचा:

पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस; लवासा, लोणावळा, निमगिरी, माळीणमध्ये अतिवृष्टी

पुणे जिल्ह्यात जेमतेम १२०० हेक्टरवर पेरण्या, पश्चिम पट्ट्यात भात रोप वाटिका टाकण्यास वेग

पुणे : मुसळधार पावसामुळे वडिवळे पूल गेला वाहून

 

Back to top button