पुणे : गॅस संपल्यामुळे लाकडावर अंत्यसंस्कार ; धोबीघाट स्मशानभूमीतील घटना  | पुढारी

पुणे : गॅस संपल्यामुळे लाकडावर अंत्यसंस्कार ; धोबीघाट स्मशानभूमीतील घटना 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या धोबीघाट मुक्तिधाम येथे लायन्स क्लब बिबवेवाडीच्या वतीने अत्याधुनिक गॅस दहिनी उभारून देण्यात आली. मात्र, गॅस संपल्यामुळे दाहिनी बंद होती. परिणामी एका मृतदेहावर  लाकडावर अंत्यसंस्कार करावे लागले. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कारभारविषयी सामन्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

धोबीघाट स्मशानभूमीतील दाहिनी सुमारे दीड वर्ष बंद होती. त्याठिकाणी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करुन पुणे शहरातील पहिली गॅस दाहिनी उभाण्यात आली. त्या गॅस दाहिनेचे गेल्या आठवड्यात 23 जून रोजी उद्घाटनही करण्यात आले. मात्र, गुरुवारी  सकाळी नाना पेठेतील मंजुळाबाई चाळ येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मृतदेहावर गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार करायचे होते. परंतु गॅस दाहिनीच बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याच ठिकाणी लाकडांवर अंत्यसंस्कार करावे लागले.

बुधवारी सायंकाळी  ४ वाजता अंत्यसंस्कारासाठी मृतदेह दाहीनीत टाकण्यात आले होते. मात्र गॅस संपल्याने ते जळण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे उशिरा रात्री एक वाजण्याच्या सुमारास मृतदेहाचे अंत्यसंस्कार पूर्ण झाले. गुरुवारी सकाळी 11 वाजता गॅस भरण्याचे काम सुरू होते, असे सांगण्यात आले.

गॅस सिलेंडरवर चालते  दाहिनी

नवीन गॅस दहिनिसाठी सहा गॅस सिलेंडर वापरले जातात. चार सिलेंडर हे रेग्युलेटर सह काम करतात तर इतर दोन सिलेंडरला रेग्युलेटर नसल्याने ते वापरता येत नाही. या दहिनीला एमएनजीएलचा पुरवठा केला जाणार असून, त्याला अंदाजे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे सध्या ही गॅस दाहिनी  प्रत्येकी ४७ किलो वजनी सहा सिलेंडरच्या सह्याने चालवली जात आहे.

प्रशासनाने फेटाळले आरोप

गॅस संपल्यामुळे मृतदेह अर्धवट जळाल्याचा प्रकार घडला आहे का, याविषयी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विद्युत विभागाचे अधीक्षक विजय चव्हाण म्हणाले, असा प्रकार घडलेला नाही. परंतु गॅस संपल्यामुळे नवीन सिंलेडर जोण्यासाठी थोडा वेळ लागतो. सकाळी गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी एका मृतदेहावर  लाकडांवर अंत्यसंस्कार केले आहे.

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेलो असता.  गॅस संपल्यामुळे  दाहिनी बंद असल्याची माहिती देण्यात आली. बुधवारी अंत्यसंस्कारासाठी दाहिनीत टाकलेला मृतदेह अर्धवट जळालेला आहे. त्यामुळे दुसऱ्या मृतदेहावर लगेच अंत्यसंस्कार करता येणार नाहीत, असे सांगण्यात आले. 

                                                                  – आतिश कुऱ्हाडे (कार्यकर्ते) 

हे ही वाचा : 

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी जम्मू-काश्मीर येथून पहिली तुकडी रवाना; LG सिन्हा यांनी दाखवला हिरवा झेंडा

सातारा : पंढरीला जाताना काळाचा घाला; एक ठार, 7 जखमी

Back to top button