Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी जम्मू-काश्मीर येथून पहिली तुकडी रवाना; LG सिन्हा यांनी दाखवला हिरवा झेंडा | पुढारी

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी जम्मू-काश्मीर येथून पहिली तुकडी रवाना; LG सिन्हा यांनी दाखवला हिरवा झेंडा

पुढारी ऑनलाइन डेस्क : Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंची पहिली तुकडीला जम्मू काश्मीर येथून रवाना झाली. यावेळी उपराज्यपाल आणि अमरनाथ श्राइन बोर्डचे अध्यक्ष मनोज सिन्हा यांनी जम्मू बेस कॅम्प यात्री निवास येथून पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. यात्रेकरू पहलगाम आणि बालटालला कडक सुरक्षेत रवाना होतील. यावेळी बसमधील यात्रेकरूंनी बाबा अमरनाथ की जय, भोले बाबा की जय, भगवान भोलेनाथ की जय, असा जयघोष केला.

अमरनाथ यात्रेकरूंसाठी कडक सुरक्षेचे प्रबंध करण्यात आले आहे. भाविकांची पहिली तुकडी गुरुवारीच जम्मूच्या आधार शिविर (बेस कॅम्प) भगवतीनगरला पोहोचली होती. शुक्रवारी पहाटे सव्वाचार वाजता पूजा अर्चना केल्यानंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी यात्रेकरूंच्या बसला हिरवा झेंडा दाखवला. अमरनाथ यात्रेला रवाना झालेली ही पहिली तुकडी शनिवारी पारंपारिक बालटाल आणि पहलगाम या मार्गाने अमरनाथच्या पवित्र गुफेच्या दिशेने पुढील वाटचाल करेल. बालटाल मार्गाने जाणारी तुकडी शनिवारी हिमलिंगाचे दर्शन करून पुन्हा परतणार आहे.

अमरनाथ यात्रेसाठी गुरुवारपर्यंत 1600 पेक्षा अधिक यात्रेकरू जम्मू येथील भगवतीनगरच्या आधार शिविरात पोहोचले होते. त्यामुळे बेस कॅम्पमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांसाठी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवण्यात आले होते. प्रवेशद्वार लखनपूर येथून काश्मीरपर्यंत संपूर्ण वातावरण शिवमय बनले आहे. प्रशासनाकडून जम्मू-श्रीनगर महामार्गावर यात्रेकरूंसाठी कट ऑफ वेळ जारी करण्यात आली आहे.

दरम्यान अन्य वाहने देखील काल सोडण्यात आली. हे पाऊल यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उचलले आहे. पर्यटन विभागाकडून शेड्यूल नुसार उधमपूरच्या टिकरी, चंद्रकोट आणि अन्य स्थानांवर या यात्रेकरूंचे स्वागत केले जाईल. तसेच या दरम्यान यात्रा मार्गावर सामान्य वाहनांची ये-जा बंद राहणार आहे.

amarnath yatra 2
amarnath yatra 2

Back to top button