पिंपरी: नाशिक फाटा, निगडी, भक्ती-शक्ती उड्डाण पुलावर रोषणाई | पुढारी

पिंपरी: नाशिक फाटा, निगडी, भक्ती-शक्ती उड्डाण पुलावर रोषणाई

पिंपरी (पुणे) : महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पूल, निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाण पूल आणि निगडी टिळक चौकातील मधुकर पवळे उड्डाण पुलाभोवती रंगीत दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. यासह विविध कामांच्या खर्चांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मंगळवारी (दि.27) मान्यता दिली.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, विषयाशी संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. शहरातील उड्डाण पुलावर रोषणाई करून सुशोभीकरण केले जात आहे. त्याअंतर्गत तीन उड्डाण पुलांवर रोषणाई केली जाणार आहे. विद्युत विभागाच्या या कामास आयुक्तांनी मंजुरी दिली.

पालिकेच्या वतीने तृतीयपंथीयांना कौशल्य प्रशिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली. त्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृता 2.0 अभियानअंतर्गत चिखली तलावाचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

खेड तालुक्यातील वाकी तर्फे वाडा येथील भामा आसखेड धरणाजवळ गट क्रमांक 28 पैकीमधील अँप्रोज ब्रीज व इतर अनुषंगिक कामाकरिता पालिका हद्दीबाहेरील जमिनीचे भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आली. शहरातील विविध भागांतील ड्रेनेजलाईन व चेंबरची देखभाल व दुरुस्ती करण्यास तसेच, भुयारी गटार नलिका टाकणे व दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली. पालिकेच्या सर्व रुग्णालयांत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व तत्सम योजना अंमलबजावणीकामी एजन्सी नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली. पिंपरीतील सावित्रीबाई फुले अकादमीकरिता पुस्तके खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.

हेही वाचा:

पुणे: दोन हजारांच्या नोटा खपवा ! पेट्रोल पंप, दुकानांमध्ये वाढला कॅश व्यवहार

पुणे : प्राथमिक शाळांमध्ये 40 टक्के शिक्षक कमी

पुणे : तोरणाच्या दुर्गम भागातील रुग्णवाहिका बंद

 

Back to top button