Ashadhi wari 2023 | श्री विठ्ठल-रूक्मिणी माऊलीसाठी बनवला ‘राजकमल’ फुलांचा दुर्मिळ हार, जाणून घ्या त्या विषयी | पुढारी

Ashadhi wari 2023 | श्री विठ्ठल-रूक्मिणी माऊलीसाठी बनवला 'राजकमल' फुलांचा दुर्मिळ हार, जाणून घ्या त्या विषयी

तेजस्वीनी तांदळे

 
आषाढी वारीनिमित्त सारी पंढरी गजबजली आहे. सगळीकडे चैतन्याचे भक्तिमय वातावरण आहे. वारकऱ्यांमध्येदेखील उत्साह दिसत आहे. श्री विठ्ठल भक्तांनीदेखील माऊलीची ओढ लागली आहे. दरम्यान, पुण्यातील एका विठ्ठल भक्ताने कोलकत्यातून ‘राजकमल’ फुले आणून विठ्ठल-रूक्मिणी माऊलीसाठी हा खास हार तयार (Ashadhi wari 2023) करून घेतला आहे.

आषाढी वारीनिमित्त शासकीय पूजा होणार आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणी माऊलीसाठी आकर्षक असा राजकमल या दुर्मिळ फुलांचे हार बनवण्यात आले आहेत. पुण्यातील भाविक दिनकर भोसले यांनी हा हार बनवला आहे. विष्णूला कमळाचे फूल आवडते म्हणून त्यांनी हा हार बनवून घेतला आहे. या हारासाठी दुर्मिळ फुले वापरण्यात आली आहेत. हारासाठी वापरण्यात आलेले ‘राजकमल’ ही कमळाची फुले त्यांनी कोलकत्याला जाऊन खरेदी केली आहेत. त्यानंतर हा खास हार बनवून घेतला आहे. गेल्या ५ दिवसांपासून दिनकर भोसले यांनी या हाराची तयारी सुरू केली आहे. हा हार अतिशय सुंदर आणि आकर्षक (Ashadhi wari 2023) बनवण्यात आला आहे.

Ashadhi wari 2023 : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी २५ प्रकारच्या ७ टन फुलांची सजावट

आषाढी यात्रेच्या महासोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात २५ प्रकारच्या विविध रंगबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट केली आहे. या सजावटीसाठी तब्बल ७ टन फुलांचा वापर करण्यात आलाय. आज विविध पाना फुलांच्या सजावटीने श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचे रूप खुलले आहे. मंदिरात विठ्ठल गाभारा, रूक्मिणी गाभारा, सोळखांबी, बाजीराव पडसाळी, प्रवेशद्वाराची तोरणे या ठिकाणी फुलाची सजावट केल्याने मंदिर आकर्षक दिसत आहे. २५ प्रकारची फुले पाच प्रकारची पाने यामध्ये वापरली आहेत. यामध्ये झेंडू ,ग्लेडियटर,जरबेरा, गुलाब, शेवंती गुलछडी, ओरचिड ,ग्लेडियो रतत्म अशा ३० प्रकारच्या फुलांचा यामध्ये वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button