पिंपरी: आकुर्डी परिसरातील विद्युत तारांना वेलींचा विळखा | पुढारी

पिंपरी: आकुर्डी परिसरातील विद्युत तारांना वेलींचा विळखा

आकुर्डी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: परिसरातील विद्युत पुरवठा करणार्‍या महावितरणच्या तारांना वेलींचा विळखा पडला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी विद्युत खांबांवर आलेल्या झाडांची फांदी तसेच वेली काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. घरालगतच विजेच्या खांबांवर असे वेली वाढल्याने विद्युत खांबावरील दिव झाकला जात आहे. त्यामुळे परिसरात अंधार पडतो. दरवर्षी येथील खांबांवर असाच वेलींचा विळखा असतो. या वेली अशाच खांबांबर सुकून जातात. पावसाळ्यापूर्वी पालिका व महावितरण विभागाने विद्युत तारा किंवा पथदिवे यांना अडथळा ठरणार्‍या झाडांच्या फांद्या व वेलींची छाटणी करावी, अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे.

शॉर्टसर्किट किंवा विद्युतपुरवठा खंडित होण्याची शक्यता

आकुर्डी परिसरात विद्युत तारा, वेलींच्या विळख्यात सापडल्या आहेत. पावसाळ्यात वीजप्रवाह झाडांच्या फांद्यातून, वेलीत उतरू शकतो. शहरातील अनेक भागांतील खांब हे रस्त्यालगत, लोकवस्तीत असल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा:

पहिल्याच पावसात तुंबले पाणी ! पुण्यातील रस्त्यांची दुर्दशा

येरवडा : ‘मुळा-मुठा’त राडारोडा टाकून बनविले बेट ! शांतीनगर परिसरात पुराचा धोका

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रगती कौतुकास्पद : वासवान केरळ

 

Back to top button