फ्लॉवरला बाजारभाव वाढला; शेतकर्‍यांमध्ये समाधानाची लाट | पुढारी

फ्लॉवरला बाजारभाव वाढला; शेतकर्‍यांमध्ये समाधानाची लाट

लोणी धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात तरकारी माल म्हणून मुख्य पीक असलेल्या फ्लॉवर पिकाला 10 किलोसाठी 140 ते 180 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळू लागला आहे. बाजारभाव वाढल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी कोबी, टोमॅटोबरोबरच फ्लॉवर पीक मोठ्या प्रमाणात घेतात. यापूर्वी 10 किलोसाठी फ्लॉवर पिकाला 40 ते 50 रुपये बाजारभाव होता. फ्लॉवर पिकाचा उत्पादन खर्च पाहता रोपे, लावणी, खुरपणी, फवारणी, तोडणी, वाहतूक खर्च धरून खर्च होतो. त्यामुळे 40 ते 50 रुपये दराने फ्लॉवर विकल्यास शेतकर्‍यांना म्हणावे असे पैसे मिळत नाहीत.

मात्र, गेल्या काही दिवसांत प्रतवारी केलेल्या फ्लॉवरला 10 किलोसाठी 140 ते 180 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्याने ग्राहकांकडून भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. त्यामध्ये फ्लॉवरचाही समावेश आहे. पुढील दिवसांतही असेच दर टिकून राहावेत, अशी अपेक्षा बेलसरवाडी, निरगुडसर येथील शेतकरी गुलाबराव गावडे, रावसाहेब केदार यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा 

शेतकर्‍यांनी पेरणीसाठी घाई करू नये; हवामानतज्ज्ञांचे आवाहन

रिंकू राजगुरू फारच बदलली, निळ्या कॉटन साडीत खुललं रुप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

Back to top button