शेतकर्‍यांनी पेरणीसाठी घाई करू नये; हवामानतज्ज्ञांचे आवाहन | पुढारी

शेतकर्‍यांनी पेरणीसाठी घाई करू नये; हवामानतज्ज्ञांचे आवाहन

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांनी पेरणीसाठी घाई करू नये. जमिनीत 7 इंच पावसाची ओल तयार झाल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्ला हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकर्‍यांना दिला. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर (ता. आंबेगाव) येथे झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख बोलत होते. डख म्हणाले, की राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असून, दुष्काळ पडणार नाही. सर्व शेतकर्‍यांच्या पेरण्या पूर्ण होतील.

गेल्या चार ते पाच वर्षांत पावसाने आपली दिशा बदलल्यामुळे व पृथ्वीचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे राज्यासह देशभरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. यापुढे महाराष्ट्रात 27/28 जूनपासून पावसास सुरुवात होईल, तर आता 2 जुलैपर्यंत दिवसाआड पाऊस होईल. त्यानंतर 6 जुलै ते 9 जुलैदरम्यान पाऊस होईल. 14 जुलै ते 17 जुलै या तारखांना राज्यातील 80 टक्के भागात पाऊस होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. दर वर्षी 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरदरम्यान राज्यात सर्वत्र पाऊस होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

शिर्डीच्या दर्शनबारीवरून तू-तू मैं-मैं! पालकमंत्री विखे पा.- आ. थोरात यांच्यात रंगला कलगीतुरा

कोपरगाव : पाऊस नसताना वाहती झाली गोदामाई..!

Back to top button