पुणे : प्रमाणापेक्षा जास्त शालेय मुलांची वाहतूक करता यावी, याकरिता पुण्यातील स्कूल व्हॅनचालकांनी शक्कल लढवत अंतर्गत आसनक्षमतेच्या रचनेत बदल केले आहेत. त्यांनी गाडी सोबत येणारी मूळ आसने काढून छोट्या आकाराची आसने आरटीओला न माहिती देताच परस्पर बसवली आहेत. या प्रकाराकडे पुणे आरटीओचे दुर्लक्ष होत असून, स्कूल व्हॅनचालक मोटार वाहन कायद्यातील नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.