नागपूर : राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांचा होणार सत्कार | पुढारी

नागपूर : राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांचा होणार सत्कार

नागपुर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गुरुवारी ( दि. २९) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर आणि ग्रामीणच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष झाल्यानंतर प्रफुल पटेल यांचे नागपूर शहरात पहिल्यांदाच आगमन होणार आहे.

हा कार्यक्रम कोहिनूर लॉन, वाठोडा रिंग रोड मार्ग, स्वामीनारायण मंदिराजवळ सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असून या सत्कार कार्यक्रमाला माजी मंत्री आ. दिलीप वळसे पाटील यांच्यासहित अन्य नेते मंडळी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांनी दिली. पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहर व ग्रामीणची बैठक बुधवारी सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालय गणेशपेठ येथे आयोजित केल्याचीही माहिती देशमुख यांनी दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button