पुणे: कात्रज परिसरात नागरिक सुखावले | पुढारी

पुणे: कात्रज परिसरात नागरिक सुखावले

कात्रज (पुणे): शहराचे दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या कात्रज परिसरात सकाळपासून आभाळ भरून आले होते. यामुळे आठच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक पहिल्या पावसाने सुखावले. कात्रज, सुखसागरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, आंबेगाव परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने अधूनमधून जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी अंतर्गत व मुख्य रस्त्यांवरून पाणी वाहिले. हवेत गारावा निर्माण झाल्याने गेल्या तीन-चार महिन्यांपासून उन्हाच्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

हेही वाचा:

Ukraine on Putin VS Wagner : वॅगनर गटाच्या बंडावर युक्रेनने उडविली रशियाची खिल्ली म्हणाले, ही तर..

Uttar Pradesh Mainpuri Murder Case : उत्तर प्रदेशमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या

US Return Antiquities Of India : भारताच्या १०० ऐतिहासिक वस्तू परत करण्याचा अमेरिकेचा निर्णय; मोदींनी मानले आभार

 

Back to top button