विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी : भोसरी-चर्‍होली पीएमपीएमएलची मोफत बससेवा

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी : भोसरी-चर्‍होली पीएमपीएमएलची मोफत बससेवा

Published on

पिंपरी (पुणे) : शहरात पीएमपीएमएलच्या माध्यमातून एकूण 25 स्कूल बस धावत आहेत. आता नव्यानेच पीएमपीएमएलने चर्‍होली येथील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे. या बसच्या फेर्‍यांचे शुल्क महापालिकेच्या वतीने भरले जाणार आहे.

यापूर्वीदेखील पिंपरी – चिंचवड महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरू केली होती. ही बससेवा कोरोना साथीच्या काळात बंद झाली. कोरोनाचे संकट टळल्यानंतर बंद पडलेली बससेवा पुन्हा सुरू झालेली नाही. चर्‍होली येथील या शाळेमध्ये आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवरुन मोठ्या प्रमाणात मुले येतात. या मुलांना ये-जा करताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मोफत बससेवेचा लाभ परिसरातील विद्यार्थ्यांना होणार आहे, असे मत शाळेचे मुख्याध्यापक वसंत चिमटे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news