‘आरटीई’च्या फेर्‍यांतील 708 जागा रिक्त | पुढारी

‘आरटीई’च्या फेर्‍यांतील 708 जागा रिक्त

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी 25 टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या दोन फेर्‍यांमध्ये 3281 जागांपैकी ‘आरटीई’चे 2052 प्रवेश झाले आहेत. अद्याप 708 जागा रिक्त आहेत.
या वर्षी 172 शाळा ‘आरटीई’ प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत. तर आरटीईसाठी 3281 जागा उपलब्ध आहेत.

यामध्ये आकुर्डी उन्नत केंद्रांतर्गत येणार्‍या शाळांमध्ये 2185 जागांपैकी 1700 प्रवेश झाले आहेत. तर, पिंपरी उन्नत केंद्रातंर्गत येणार्‍या शाळांमध्ये 1096 जागांपैकी 862 जागांवर प्रवेश झाले आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेली प्रवेशप्रक्रिया शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली तरी अद्याप सुरूच आहे.

सध्या 708 जागा शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या पाल्यांचा अजूनही प्रवेश झालेला नाही, त्या पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. तिसरी फेरी दोन दिवसांनंतर सुरू केली जाणार आहे. प्रवेशप्रक्रियेसाठी नॉन अ‍ॅप्रोच असलेल्या व्यक्तींशी संपर्क करून प्रवेश करून घेतला जाणार आहे.

हेही वाचा

जालना : शेगाव दर्शनाहून परतणाऱ्या कारचा अपघात; महिलेचा होरपळून मृत्‍यू

कौतुकास्पद ! पाथर्डीचा सुपुत्र फायटर पायलट; दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते गौरव

नेहा पेंडसे आहे चक्क सहा मुलांची आई?

Back to top button