कौतुकास्पद ! पाथर्डीचा सुपुत्र फायटर पायलट; दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते गौरव

कौतुकास्पद ! पाथर्डीचा सुपुत्र फायटर पायलट; दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते गौरव

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील अनेक भूमिपुत्रांनी वेगवेगळ्या प्रशासकीय व खासगी क्षेत्रात बुद्धिमत्तेवर उत्तीर्ण होऊन कार्यरत झाले आहेत. असाच तालुक्यातील भिलवडेचा सुपुत्र प्रसाद दिनकर बडे हा फायटर पायलट झाला आहे. याचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचा दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यामुळे तालुक्याचा झेंडा दिल्लीत फडकला आहे. प्रसाद बडेचे वडील दिनकर नाथा बडे कॅप्टन म्हणून सेनादलात कार्यरत असून, प्रसाद बडेचे प्राथमिक ते मॅकेनिकल इंजिनिअरपर्यंतचे शिक्षण पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झाले. तालुक्यातील अनेक मुले-मुली देशाच्या सर्वच क्षेत्रात विविध प्रकारची चांगल्या प्रकारची सेवा बजावतात. यामध्ये अजून एका तरुण तडफदार फायटर पायलटची भर पडल्याचे बोलले जात आहे.

इंजिनिअरिंगनंतर एअरफोर्सचे परीक्षा

इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी एअरफोर्सचे परीक्षा दिली. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर जानेवारी 2022 मध्ये तो हेंद्राबाद येथील हवाईदलाच्या ट्रेनींग अकादमीत प्रशिक्षणासाठी दाखल झाला. शनिवारी, 17 जूनला त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news