सावधान ! पुण्यात 1500 स्कूल व्हॅन धावतात विना फिटनेस | पुढारी

सावधान ! पुण्यात 1500 स्कूल व्हॅन धावतात विना फिटनेस

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुण्यातील तब्बल 5 हजार 71 शालेय वाहतूक करणार्‍या वाहनचालकांनी आतापर्यंत वाहनांची फिटनेस तपासणी केली आहे. अजूनही शहर आणि परिसरातील 1500 शालेय वाहनचालकांनी फिटनेस तपासणीसाठी हजेरी लावली नसल्याचे समोर आले आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यापूर्वी वाहनाची फिटनेस तपासणी करणे म्हणजेच आरटीओकडून वाहन तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. मात्र, शाळा सुरू होऊन 10 दिवस होत आले तरीही अद्याप काही शालेय वाहतूक करणार्‍या वाहनचालकांनी वाहनांची फिटनेस तपासणी केलेलीच नाही. त्यामुळे शालेय वाहतूक करणार्‍या वाहनाचे आगामी काळात अपघात होण्याची शक्यता आहे.

म्हणून फिटनेस तपासणी आवश्यक
गेल्या काही वर्षांत फिटनेस तपासणी न केलेल्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनला आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत, अनेक गाड्यांचे अपघात झाले आहेत. अशा घटना टाळण्यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय गाड्यांची आरटीओकडून तपासणी आवश्यक आहे. परंतु, काही वाहनचालक आपल्या गाड्या आरटीओकडे हजर करत नसल्याचे समोर आले आहे.

शालेय वाहनाची फिटनेस तपासणी न करताच विद्यार्थी वाहतूक करणे, चुकीचे आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याकरिता आमची तीन पथके नेमण्यात आली आहेत. तसेच, राहिलेल्या वाहनचालकांना अपॉईंटमेंट घेऊन शनिवारी आणि रविवारीदेखील वाहनाची फिटनेस तपासणी करता येईल.
                                         – संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे 

हे ही वाचा : 

अहमदनगरमध्ये पाणी कपातीची गरज नाही : जिल्हाधिकारी

अहमदनगर : कचरा कागदावर, अ‍ॅनिमल वेस्ट रस्त्यावर

Back to top button